कवठ आणि मी

कवठ आणि माझा लहानपणापासूनच ३६ चा आकडा.
कवठ दिसलं की मला क्रिकेट बॉलची आठवण येते आणि माझ्यातला क्रिकेटर जागृत होतो आणि मनातल्या मनात मी त्याला सिक्सर मारून स्टेडियमच्या बाहेर फेकून देतो .
घरातही ते खाण्याला लहानपणापासून आता पर्यंत विरोध करत आता आलो आहे.
सध्या घरात आम्ही दोघेच असल्याने मी मेजॉरिटीत नसणार हे उघडच आहे. लोकशाहीत शेवटी मेजॉरिटी हीच महत्वाची . तरीपण आज पर्यंत मी माझा पवित्रा टिकवून आहे.
पण आज दुपारी मला सांगण्यात आले की कवठाची चटणी केलेली आहे ,तब्येतीला फार चांगली असते आणि तू ती खा (ल्ली पाहिजेसच).
मी माझ्या बॉडी लँग्वेज मधून आणि शब्दातून (अतिशय लो व्हॉल्युम मध्ये ) विरोध दर्शवला .
पण जेवायला बसल्यानंतर ताटामध्ये ती जगप्रसिद्ध चटणी दिसलीच. क्षणभर विचार करताच मला आठवली "इट दॅट फ्रॉग !" या ब्रायन ट्रेसीच्या प्रसिद्ध पुस्तकात दिलेली स्ट्रॅटेजी. त्यात सांगितले आहे की सकाळी उठल्यानंतर तुमचे सगळ्यात महत्त्वाचे काम आधी पूर्ण करा.
त्या स्ट्रॅटेजीला अनुसरून जेवायला सुरू करण्याच्या आधी मी माझे सगळ्यात महत्त्वाचे काम पूर्ण केले ते म्हणजे ती चटणी एका घासात संपवली.
चक्क मला चव आवडली.
उदार मनाने मी आपला विरोध मागे घेतला आणि चटणीची चव चांगली आहे अजून वाढ असे सांगितले.
त्याबरोबर पुन्हा चटणी वाढण्यात आली ( पण त्या वेळी चेहऱ्यावर मिश्कील हास्य होते जे माझ्या लक्षात नाही आले 😞).
पण चटणीचा रंग वेगळा होता.
हे काय इतक्या लवकर चटणीचा रंग कसा काय बदलला?
उत्तर अगदी eye 👁 ओपनर होते.
आधीची चटणी टोमॅटोची होती आणि नंतरची होती माझे खरे चॅलेंज.
पण पण पण.... एक बार कमिटमेंट कर लीं तो मै भी अपने आपकी नही सुनता 😎.
घेतला एक मोठा घास आणि केली चटणी खल्लास 💪👊.
आज परीक्षेत झालो पास.
उद्या जाणार आहे आय स्पेशालिस्ट कडे डोळे तपासण्यास 🥸.